11 class Book-keeping & accountancy 1st topic notes english and marathi part 1
Accountancy class
1 st Topic Notes
1 Introduction to Book-keeping and Accountancy
1. Evolution of Accounting :
In India, during Chandragupta Maurya’s regime, Minister Kautilya wrote a book named ‘Arthashastra’, where in some references can be traced regarding the way of maintaining accounting The records of debit and credit were found in the 12th century itself.In the year 1494, Luca De Bargo Pacioli, an Italian merchant introduced Double-Entry Book-keeping system.
1.लेखांकनाची उत्क्रांती (Evolution of Accounting) :
भारतामध्ये चंदगुप्त मौर्य यांच्या काळात मंत्री कौटिल्य यांनी अर्थशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले होते, ज्यामध्ये काही संदर्भ,खाती सांभाळण्यास ठेवण्याचे मार्ग शोधले गेले. १२ व्या शतकात नावेआणि जमानोंदी आढळलेल्या प्रतिनिधीने(एजंटने) लेखालेखन केले, १४९४ मध्ये ‘ल्युका डि बर्गो पॅसिओली’ या इटालियन व्यापाऱ्याने पुस्तपालनाची दुहेरी नोंद पद्धती विकसीत केली.
2 Book keeping meaning:-
Book-keeping is an art or science of systematic recording, classifying and summarising the financial transactions of business for a particular period, generally one year.
2. अर्थ व संकल्पना :
पुस्तपालन कला व शास्त्र असून त्यामध्ये वित्तीय व्यवहारांची नोंद शास्त्रीय, वर्गीकृत व सारांश रूपाने विविध कालावधीसाठीप्रामुख्यानेएक वर्षासाठी केल्या जातात.
3. Definition of Book-Keeping
Richard E. Strahelm : “The art of analyzing and recording business transactions, reporting
results of business operations through periodic statements and interpreting such results for purposes of effective control of future operations.”
J. R. Batliboi : “Book-keeping is an art of recording business dealings in a set of books.”
Nocth Cott: “Book-keeping is an art of recording in the books of accounts the monetary aspects
of commercial or financial transactions.”
R.N. Carter : “Book-keeping is the science and art of correctly recording in the books of
accounts, all those business transactions that results in transfer or money or money’s worth.”
3. पुस्तपालनाची व्याख्या (Definition of Book-Keeping)
रिचर्ड ई. स्ट्राहेल्म : व्यवसायाच्या व्यवहाराचे विश्लेषण करणेआणि नोंदविण्याची कला, भविष्यातील कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी तपशीलांसह व्यवसाय परिणामांचा अहवाल देणे आणि अशा परिणामांचे स्पष्टीकरण पुस्तपालन करते.
जे. आर. बाटलीबॉय : पुस्तपालन ही पुस्त संचामध्ये व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद करण्याची कला आहे.
नोथ कॉट : पुस्तपालन ही पैशांमध्ये व्यक्त होणारी व्यावसायिक किंवा आर्थिक व्यवहार नाेंद लेखापुस्तकी करण्याची कला
आहे.
आर. एन. कार्टर : पुस्तपालन म्हणजे व्यवसायातील व्यवहार पैशाच्या संबंधीत असलेले योग्य पद्धतीने पुस्तकांमध्ये
नोंदविण्याची विज्ञान आणि कला आहे. त्या सर्व व्यवसायांच्या व्यवहाराच्या परिणामामुळे पैसा किंवा पैशाची किंमत हस्तांतरित होते.
4. Features of Book-keeping:
1) It is the method of recording day to day business transactions.
2) Only financial transactions are recorded.
3) All records are prepared for a specific period which are useful for future references.
4) Records of transactions are based on rules and regulations.
5) It is an art of recording business transactions scientifically.
4. पुस्तपालनाची वैशिष्ट्ये : -
१) हे दररोजच्या व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद करण्याची पद्धत आहे.
२) केवळ आर्थिक व्यवहार नोंदविले जातात.
३) सर्व नोंदी विशिष्ट कालावधीसाठी तयार केल्या जातात ज्या भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त आहेत.
४) व्यवहारांच्या नोंदी या नियम व नियमनावर आधारीत आहे.
५) व्यावसायिक व्यवहार वैज्ञानिकरित्या नोंदविण्याची ही कला आहे.
5. Objectives of Book-keeping:
1) The main objective of book-keeping is to keep a complete and accurate record of all the financial
transactions in a systematic, orderly and logical manner.
2) All the business transactions are to be recorded date wise and account wise.
3) Book-keeping serves as a permanent record of the monetary transacitons of an enterprise
business and it can be produced as an evidence, whenever and wherever required.
4) To know the profit or loss of the business during the financial year.
5) To know the total assets and liabilities of the enterprise.
6) To know what the businessman owes to others and what others owe to him.
7) Businessman comes to know the current year’s progress over previous year and compares its
financial results with other business enterprise in similar line.
5 .पुस्तपालनाची उद्दिष्ट्ये :
१) पुस्तपालनाचे मुख्य उद्दिष्ट हे सर्व आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित आणि तर्कशुद्ध पद्धतीनेपूर्ण आणि अचूक माहिती ठेवणे
आहे.
२) सर्व व्यावसायिक व्यवहारांची नोंद तारखेनुसार आणि खात्यानुसार करणे.
३) पुस्तपालन व्यवसायाच्या व्यवहाराचे कायमस्वरुपी माहिती म्हणून कार्य करतेआणि जेव्हाही आवश्यक असेल तेव्हा ते पुरावे
म्हणून सादर केलेजाऊ शकते.
४) व्यवसायाचा आर्थिक वर्षातील नफा किंवा तोटा जाणून घेणे.
५) व्यवसायाची एकूण मालमत्ता आणि दायित्वे जाणून घेणे.
६) व्यवसायाचा मालकाची व्यावसायिक देणी जाणून घेणे.
७) व्यवसायाला गेल्या वर्षीच्या प्रगतीबद्दल किंवा समान व्यवसायाशी जोडलेल्या इतर व्यवसायाशी तुलना करणे.
6. Importance of Book-keeping:
The importance of Book-keeping is as follows:
1) Record : It is not possible for anyone to remember all transactions. But Book-keeping maintains
records of all the transactions permanently and systematically in the books of accounts.
2) Financial Information: Book-keeping is useful to get information related to Profit, Loss,
Assets, Liabilities, Investments and Stock, etc, at any given time.
3) Decision Making: Book-keeping provides financial information to the businessman for decision
making.
4) Controlling: Book-keeping enables the executives of the business to control the activities of the
business.
5) Evidence: Businessman needs financial evidence to be produced in the Court of law in case of
any disputes.
6) Tax Liability: Book-keeping is useful to find out the tax liabilities e.g. : Income Tax, Property
Tax, GST, etc.
6. पुस्तपालनाचे महत्त्व :
पुस्तपालनाचे महत्व खालील प्रमाणे सांगता येईल. :
१) नोंदी (Record) : नोंदविलेले सर्व व्यवहार काेणालाही लक्षात ठेवणे शक्य नाही. परंतु पुस्तपालन सर्व व्यवहारांची नोंदी कायम स्वरुपी आणि शास्त्रीय पद्धतीने सांभाळते.
२) आर्थिक माहिती (Financial Information) : व्यवसायातील नफा, तोटा, मालमत्ता, दायित्वे, गुंतवणूक आणि स्कंध इ. माहिती मिळविण्यासाठी पुस्तपालन उपयुक्त आहे.
३) निर्णय घेण्यास उपयुक्त (Decision Making) : निर्णय घेण्याकरिता पुस्तपालन व्यवसायिकांना आर्थिक माहिती प्रदान
करते.
४) नियंत्रण करण्यासाठी (Controlling) : पुस्तपालनाद्वारे उपलब्ध झालेल्या आर्थिक माहिती आणि आकडेवारीद्वारे व्यवसायावर नियंत्रण ठेवता येते.
५) पुरावे (Evidence) : कोणत्याही विवादास्पद प्रकरणात व्यावसायिकांना न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्यास उपयुक्त ठरते.
६) कर दायित्व (Tax Liability) : सर्व कर देयकेशोधण्यासाठी पुस्तपालन उपयुक्त आहे उदा. आयकर, वस्तू व सेवा कर, मालमत्ता कर, इत्यादी.
7. Utility of Book-keeping:
1) Owner: The businessman can find out Profit, Losses, Assets and Liabilities of an enterprise at
any time.
2) Management: Management of an enterprise can plan, take decisions and control overall
business activities.
3) Investors: Investors can take proper decisions whether to invest or not.
4) Customer: Customer can easily understand financial position of the business. He can be assured
about supply of goods.
5) Government: Government can easily find out different types of taxes due from various sources.
6) Lenders: Money Lenders can find financial standing of the enterprise for decision to lend money
or not.
7) Development: Business enterprise can achieve the business growth with the help of accounting.
7. पुस्तपालनाची उपयोगिता (Utility of Book-keeping) :
१) मालक : व्यावसायिक कोणत्याही वेळी व्यवसायाचा नफा, तोटा, मालमत्ता आणि दायित्वे शोधूशकतो.
२) व्यवस्थापन : व्यवसायासाठी नियोजन, निर्णय घेण्याचे आणि संपूर्ण व्यावसायिक उपक्रमांवर नियंत्रण व्यावसायिकाला ठेवता
येते.
३) गुंतवणूकदार : गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकदाराला पुस्तपालन उपयोगी ठरते.
४) ग्राहक : ग्राहक व्यवसायाची आर्थिक स्थिती सहजपणेसमजू शकतो. वस्तूंच्या पुरवठ्याबद्दल तो खात्री बाळगूशकतो.
५) सरकार : विविध स्त्रोतांद्वारेकर शोधून काढण्यासाठी शासनाच्या विविध विभागाला पुस्तपालन उपयोगी ठरते.
६) कर्जदार : लेखा पुस्तकाच्या माध्यमातून व्यवसायाला पुढेही कर्ज पुरवठा करणेसुरू ठेवावे किंवा ठेवूनये याबाबतचे निर्णय
कर्ज देणारेघेवूशकतात.
७) विकास : व्यावसायिक व्यवसायातून लेखांकनाच्या मदतीने व्यवसायाचा विकास करू शकतो.
8. Meaning and Definition of Accountancy:
Book-keeping is a part of Accounting. It is the primary stage in accounting. It is the process of
9. Definitions:
1) “Accountancy refers to the entire body of the theory and process of accounting.” By Kohler.
2) Prof. Robert N. Anthony has defined accounting as “Nearly every business enterprise has an accounting system. It is a means of collecting,summarizing, analyzing and reporting in monetary terms information about the business transactions.”
8. लेखाकर्माचा अर्थ आणि परिभाषा :
पुस्तपालनापेक्षा लेखाकर्म ही एक व्यापक संकल्पना आहे. पुस्तपालन हा लेखाकर्माचा हिस्सा आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की पुस्तपालन चे कार्य जेथे संपते तेथे लेखाकर्माचे सुरू होते.
9. व्याख्या (Definitions) :
१) कोहलर यांच्या मते‘‘एखाद्या व्यवहाराची सर्व सैध्दांतिक बाजू आणि लेखांकिय कृती म्हणून लेखाकर्माचा उल्लेख करावा
लागेल.’’
२) प्रो. रॉबर्ट एन. ॲन्थोनी यांनी व्याख्या केली आहे की, ‘‘जवळपास सर्वच व्यापारी व्यक्तीची स्वत:ची अशी एक लेखांकिय पद्धत असते की, जो व्यापारिक व्यवहाराचे एकत्रीकरण सारांशीकरण विश्लेषण आणि मौद्रीक माहितीचा अहवाल देते.’
10. Basis (Methods) of Accounting System
(i) Cash basis :
Under the cash basis of accounting, actual cash receipts and actual cash payments are recorded.
paid. e.g. (i) Any income received, (ii) Any expense paid. Such a method of accounting is usually
(ii) Accrual or Mercantile basis
Under accrual basis of accounting, the revenue whether received or not, but has been earned or
(iii) Mixed or Hybrid basis
It is a combination of cash basis and accrual basis of accounting. Under mixed basis of accounting,
both cash basis and accrual basis are followed. Revenues and assets are generally recorded on cash
10. लेखांकनाचे मुख्य घटक (Basis of Accounting)
(१) रोख घटक (Cash basis) :
रोखीच्या व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष रोख जमा व प्रत्यक्ष रोख खर्च नोंदविले जातात.
विविध घटकांच्या आधारे लेखापुस्तके तयार केली जातात. या विविध घटकांपैकी जेव्हा रोख प्राप्त होते. तेव्हा उत्पन्नाची नोंद
केली जाते. आणि खर्चाची नोंद प्रत्यक्ष दिलेला खर्च अशा नोंदी केल्या जातात.
या आधारावर (१) कोणतेही मिळालेलेउत्पन्न, (२) कोणताही केलेला खर्च, लेखांकनाची ही पद्धत व्यावसायिकांना उपयुक्त
आहे. जसे. डॉक्टर, वकील, सी.ए. आणि नफा न मिळविणाऱ्या संस्था.
(२) उपर्जित घटक (Accrual basis)
या पद्धतीमध्ये प्राप्त झालेलेउत्पन्न व येणेउत्पन्न तसेच प्रत्यक्ष केलेला खर्च व देय खर्च नोंदविले जातात. व्यापारी तत्त्वांचे
लेखांकन या नावानेसुद्धा ही पद्धत ओळखली जाते.
(३) संकरित किंवा मिश्रित घटक (Hybrid or Mixed basis)
हेरोख घटक आणि उपर्जित घटक यांचे मिश्रण आहे. लेखांकनाच्या मिश्रीत घटकांवर आधारीत रोख घटक आणि उपर्जित घटक
यांचे अनुकरण केलेजाते. महसुल आणि संपत्ती सामान्यपणे रोख घटकावर आधारीत नोंदविले जातात. तर विविध खर्च उपर्जित
घटकांच्या आधारे नोंदविले जातात. भारतीय कायद्याप्रमाणेह्या पद्धतीचा उपयोग केला जातो.
11. Qualitative characteristics of accounting information
१.६ लेखांकिय माहितीची गुणात्मक वैशिष्ट्
1.7.1 Transactions
Exchange of goods and services between two persons or parties for money or money's
worth is known as Transactions.
(a) Monetary Transactions:
The transaction which involves an exchange of money or money’s worth directly or
indirectly is called monetary transactions. Only monetary transactions are recorded in the books
of accounts.
1) Cash Transactions : A business transaction in which cash is paid or received
immediately is known as cash transaction.
e.g i) Purchase of goods for cash at ` 15,000/-
ii) Payment of salary at ` 5,000/-
2) Credit Transactions: A credit transaction is one in which cash is not paid or received
immediately at the time of a transaction but it is paid or received at a later date.
e.g i) Goods sold on credit to Mr. Aman at ` 8,000/-
ii) Sold machinery to Mr. Amarsingh on credit at ` 20,000/-
(b) Non-Monetary Transactions:
The transaction which does not involve an exchange of money or money’s worth directly
or indirectly are called Non-monetary transactions. An exchange of one thing against another
thing is called as Barter transactions.
1) Entry: Recording of a business transaction in the proper form or method in the
books of accounts is called an entry.
2) Narration: A brief explanation of the business transaction for which an entry is
passed is called as a narration. It is always given in a bracket below the journal
entry and it usually starts with the word "Being" or "For".
3) Goods: The term ‘goods’ refers to merchandise, commodities, articles or things in
which a trader trades. These are purchased or manufactured for the purpose of sale
and to earn profit.
e.g i) Medicines are goods for the chemist.
ii) Vegetables are goods for the vegetable vendor.
iii) Parts like tyres, engine gearbox, cables are produced by a vehicle manufacturer
like Bajaj Auto, Hero Motors.
11. व्यवहार (Transactions)
दोन व्यक्तीमधील पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे व्यवहार होय.
(अ) मौद्रीक व्यवहार (Monetary Transactions) :
(१) रोखव्यवहार : ज्या व्यवसायात रोख पैसे दिले जातात किंवा घेतले जातात अशा व्यवहारांना रोख व्यवहार म्हणून
ओळखले जाते
उदा. i) रोखीने वस्तू खरेदी रु. १५,०००/-
ii) वेतनाचे दिले ` ५,०००/
२) उधारीचे व्यवहार : उधारीचे व्यवहार म्हणजे व्यवहाराच्या वेळी ताबडतोब रोख रक्कम दिली किंवा घेतली जात नाही.
ज्या वेळेस रोख चा वापर केला जात नाही किंवा रोख प्राप्त झाली नाही परंतु नंतरच्या तारखेला रोख दिली किंवा घेतली
जाते.
उदा. i) श्री. अमनला उधारीवर माल विकला ` ८,०००/-
ii) श्री. अमरसिंग यांना ` २०,०००/- ची मशीनरी उधारीवर विकली
(ब) अमौद्रीक व्यवहार (Non-Monetary Transactions) :
ज्या व्यवहारांमध्ये पैशाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वापर होत नाही अशा व्यवहारांना अमौद्रिक व्यवहार असे म्हणतात. एका
वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू मिळणे याला वस्तुविनिमय म्हणतात.
१) नोंद : जमाखर्चाच्या पुस्तकात योग्य पद्धतीने व्यवसायाचे व्यवहार लिहिणे म्हणजे नोंद किंवा प्रविष्टी करणे होय.
२) नोंदीचे वर्णन : व्यवसायाच्या ज्या व्यवहाराची नोंद केली जाते त्या नोंदी खाली व्यवहाराचे संक्षिप्त वर्णन केलेजाते.
त्याला नोंदीचे वर्णन(स्पष्टीकरण) असे म्हणतात.हे स्पष्टीकरण नेहमी केलेल्या नोंदीखाली ‘केल्याबद्दल’ या शब्दाने
लिहितात.
३) वस्तू /माल : व्यापारात व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तू खरेदी, विक्रीसाठी वापरतो त्यास व्यापारी वस्तू
असे म्हणतात. व्यापारात या खरेदी केलेल्या किंवा तयार केलेल्या वस्तू व्यापाऱात नफा होऊन विकण्यासाठी खरेदी
किंवा तयार केल्या जातात.
उदा. i) औषधी विक्रेत्याकरिता, औषध वस्तू आहे.
ii) भाजीपाला विक्रेत्यासाठी, भाजीपाला वस्तू आहे.
iii) गाड्यांचे सुटे भाग जसे टायर, इंजीन, गिअरबॉक्स इ. ची वाहननिर्मिती करणाऱ्या बजाज ऑटो हिरो
मोटर्सच्या दृष्टीनेवस्तू आहेत.
12. Capital and Drawings:
a) Capital : The total amount invested into the business by the owner is called capital.
Excess of assets over the liabilities is also called as capital. The equation for this is :
Capital = Assets – Liabilities
Capital is a liability of the business as this amount is payable by the business enterprise to
the owner at the time of closure of the business.
b) Drawings : The amount of cash or value of goods, assets, etc., withdrawn from the
business by the owner for personal use called as drawings.
E.g. : A proprietor pays colleges fees of his son, or pays for his medical expenses, mobile
bills etc, from the business.
12. भांडवल आणि उचल (Capital and Drawings):
अ) भांडवल (Capital) : व्यावसायिकाने व्यवसायात गुंतविलेल्या संपूर्ण रकमेला भांडवल असे म्हणतात. लेखांकिय भाषेत
सांगावयाचे झाल्यास संपत्तीचे देयतेवरील आधिक्य म्हणजे भांडवल असे म्हणता येईल. हे सुत्र रूपाने खालील प्रमाणे मांडता
येईल.
भांडवल = संपत्ती -देयता
व्यवसाय बंद करताना व्यवसाय मालकाला भांडवलाची राशी व्यवसायाकडून घेणेअसल्यामुळे भांडवल व्यवसायाची देयता
ठरते.
ब) उचल (Drawings) : जर व्यवसाय मालक आपल्या व्यक्तीगत उपयोगासाठी व्यवसायातून संपत्ती किंवा वस्तू किंवा रोख
राशी घेत असेल तर त्यास उचल असेम्हणतात.
उदा : i) मालकाने व्यवसायातून मुलाचे महाविद्यालय शुल्क दिले.
ii) मुलाच्या खर्चाचे शोधन व्यवसायातून केले. जसे- औषधाचा खर्च, मोबाईल बिल इत्यादी.
13. Debtors and Creditors:
a) Debtor : A person who has to pay to the business for getting goods and services on credit is
known as debtor. A debtor is a person who owes money to the business.
b) Creditor: A person to whom business has to pay for getting goods or services on credit is
known as creditor. A creditor is a person to whom business owes money.
c) Bad Debts : An irrecoverable amount from a debtor is known as "Bad Debts". It is a revenue
loss to the business.
13. ऋणको आणि धनको (Debtors and Creditors) :
अ) ऋणको (Debtor) : जी व्यक्ती वस्तू किंवा सेवांचा उधारीवर उपभोग घेतल्यामुळे व्यवसायास देणे लागत असेल तर त्या
व्यक्तीला व्यवसायाचा ऋणको असे म्हणतात. ऋणको ही अशी व्यक्ती आहेकी, जी व्यवसायाला पैसे देणे लागते.
ब) धनको (Creditor) : ज्या व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा उधार विकत घेतल्यामुळेआपण त्या व्यक्तीला पैसे देणे लागतो,
ती व्यक्ती म्हणजे धनको होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास धनको म्हणजेअशा व्यक्ती होय की ज्यांना व्यवसाय देणे
लागतो.
(क) बुडीत कर्ज (Bad Debts) : ऋणकोकडून वसूल न होणारी राशी म्हणजे बुडीत कर्ज होय. हे व्यवसायाचे महसुली नुकसान समजले जाते.
14.Expenditure and Types of Expenditure
Expenditure: An amount spent by the business for any consideration received by business is called
expenditure.
i) Capital Expenditure : This expenditure is incurred to acquire fixed asset or to increase the
value of fixed asset. It gives the benefit for a long period of time and it is non-recurring in
nature.
E.g. : Purchase of Machinery, extension of building, purchase of computer etc.
ii) Revenue Expenditure : Revenue expenditure is an expenditure from which no future benefit
is expected but having immediate or short term benefit may be less than one year. It does not
increase profit earning capacity of an organization. These are normal day to day operating
expenses of a business organization and appear on the debit side of Trading A/c or Profit and
Loss A/c.
E.g. : Rent paid, Salary paid, Wages paid etc.
iii) Deferred Revenue Expenditure: An expenditure which is basically revenue in nature but
benefit of which is not exhausted within one year is called as Deferred Revenue Expenditure.
Such expenditure is written off over number of years. Such written off amount is shown on
debit side of profit and loss a/c and unwritten amount is shown on asset side of the Balance
Sheet.
E.g. : Heavy expenditure on advertising , heavy legal expenses.
14. खर्च आणि खर्चाचे प्रकार (Expenditure and Types of Expenditure)
खर्च (Expenditure) : कोणत्याही कारणामुळे व्यवसायाला ज्या राशीचे शोधन करावे लागते त्याला खर्च असे म्हणतात.
i) भांडवली खर्च (Capital Expenditure) : हा खर्च स्थिर संपत्ती मिळविण्यासाठी किंवा स्थिर संपत्तीच्या मुल्यात वाढ
करण्यासाठी केलेला खर्च आहे. हा खर्च दिर्घकाळपर्यंत लाभ देणारा आणि पुन्हा पुन्हा न उद्भवणाऱ्या स्वरुपाचा आहे.
उदा. : यंत्राची खरेदी, इमारतीचा विस्तार, संगणकाची खरेदी इत्यादी.
ii) महसुली खर्च (Revenue Expenditure) : महसुली खर्च हा असा खर्च आहेकी ज्यापासून भविष्यात नफा मिळण्याची
अपेक्षा नसते. परंतु ताबडतोब किंवा अल्पावधीत अर्थात एका वर्षाच्या आत लाभ मिळण्याची शक्यता असते. हा खर्च
संघटनेची लाभ प्राप्त करण्याची क्षमता वाढवित नाही.हा व्यवसाय किंवा संस्था संचालनानुसार प्रत्येक दिवशी होणारा सामान्य
खर्च आहे.
उदा. : भाडे दिले, वेतन दिले, मजुरी दिली इत्यादी.
iii) अस्थागित महसुली खर्च (Deferred Revenue Expenditure) : असे खर्च की जे मुलत: महसुली स्वरुपाचेआहेत.
परंतु ज्यांचा लाभ एका वर्षाच्या आत पूर्णपणे उपयोगी आणता येत नाही अशा खर्चांना अस्थगित दिसणारे महसुली स्वरुपाचेखर्च म्हणतात. असेखर्च काही वर्षानंतर अपलेखीत करतात. असा अपलेखीत केलेला खर्च नफातोटा खात्याच्या नावे बाजूवर दर्शवितात. अपलेखीत न केलेला खर्च ताळेबंद पत्रकाच्या संपत्ती बाजूला दर्शवितात.
उदा. : खूप मोठ्या प्रमाणात केलेला जाहिरात खर्च,
खूप मोठ्या प्रमाणात केलेला कायदेशीर खर्च
15. Cash Discount and Trade Discount :
Discount is a concession or allowance given by the seller to purchaser.
There are two types of discounts.
i) Trade Discount : It is an allowance given on catalogue price or list price of goods. This discount
is allowed at the time of purchase/sale of goods. Value of goods purchased/sold recorded is net
value payable i.e after deduction of amount of trade discount allowed. If goods of ` 1000/- are
sold at 5% trade discount, the value of goods that will be recorded will be ` 950/- both by the
purchaser and the seller and not ` 1000/-. Hence, trade discount does not appear in the books of
accounts separately.
ii) Cash Discount: It is the amount deducted from the final amount due at the time of receipt. It is
the concession given for encouraging prompt payment. It is given either for the spot payment or
for payment within a specific period. Cash discount is calculated after deducting trade discount,
since it is loss to the seller and gain to the buyer, cash discount appears in the books of accounts.
15. रोख कसर आणि व्यापारी कसर (Cash Discount and Trade Discount) :
कसर ही विक्रेत्याने ग्राहकाला दिलेली सुट किंवा सवलत होय.
i) व्यापारी कसर (Trade Discount) : व्यापारी कसर ही वस्तूंच्या विक्रीचेवेळी वस्तुंच्या किंमतीमधून कमी केलेली राशी
होय ही कसर विक्रेत्यांना वस्तूंच्या छापील किमतीमध्ये वस्तूंची विक्री करतांना नफा मिळवून देण्यास मदत करते. म्हणून
व्यापारी कसरीची लेखापुस्तकात नाेंद घेणे गरजेचे नाही.उदा. ` १,०००/- किमतीचा माल ५% व्यापारी कसरीवर विकल्यास
कसर ` ५०/- मालाच्या किमतीतून वजा केली जाते.
ii) रोख कसर (Cash Discount) : ही अशी रक्कम होय की जी रोख राशी घेतेवेळी वजा करून घेतलेली असते. शोधन
करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून दिलेली ही सूट होय. प्रत्यक्ष रक्कम देतेवेळी किंवा काही कालावधीत रक्कम घेतेवेळी
अशा प्रकारची सुट दिली जाते. व्यापारी कसर दिल्यानंतर रोख कसरीचा हिशोब केला जात असल्यामुळे रोख कसर ही
विक्रेत्याचे नुकसान आणि ग्राहकाचा फायदा असतो. या कसरीची लेखापुस्तकात नोंद केली जाते.
16. Solvent and Insolvent:
i) Solvent: If a person’s assets are more than his liabilities, or equal to his liabilities, he is called as a solvent person. Solvent person is financially sound and is in a position to pay off all his debts.
E.g. : A person’s total assets have been calculated to ` 50,00,000/- and his total debts were
` 30,00,000/- since his position is sound he is able to pay off his debts therefore he is called
Solvent.
ii) Insolvent: A person whose liabilities are more than his assets is an insolvent person. Such
person’s liabilities are more than his assets.
E.g. : A person’s total assets or property have been calculated to ` 20,00,000/- and his total debts
were ` 50,00,000/- and if he is not in a position to get any amount from any sources and if the
court is so satisfied then he will be declared as an insolvent person.
16. शोधनक्षम (दिवाळखोर नसलेला) आणि अशोधनक्षम (दिवाळखोर) (Solvent and Insolvent) :
i) शोधनक्षम (दिवाळखोर नसलेला) (Solvent) : जर एखाद्या व्यक्तीची संपत्ती, त्याच्या देयतेपेक्षा जास्त किंवा देयते बरोबर
असते, त्यावेळी त्या व्यक्तीला शोधनक्षम किंवा दिवाळखोर नसलेली व्यक्ती असे म्हणतात. अशा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या
सुस्थितीत असतात आणि आपली देणी देण्यास समर्थ असतात.
उदा. : एखाद्या व्यक्तीची संपत्ती किंवा मालमत्ता ` ५०, ००, ०००/- ची आहेआणि त्या व्यक्तीची एकूण देयता किंवा
कर्ज ` ३०,००,०००/- चेआहे. अशा परिस्थितीत ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असून आपलेकर्ज फेडण्यास समर्थ
आहे. म्हणून अशा व्यक्तीला शोधनक्षम आहेअसे म्हणतात.
ii) अशोधनक्षम किंवा दिवाळखोर (Insolvent) : अशी व्यक्ती की जी आपल्या संपत्तीतून आपली संपूर्ण देणी देण्यास असमर्थ
असते. अशा व्यक्तीची देयता ही त्यांच्या संपत्तीपेक्षा जास्त असते.
उदा. : जर एखाद्या व्यक्तीची संपत्ती किंवा मालमत्ता संपूर्ण हिशेब झाल्यानंतर ` २०,००,०००/- ची आहेआणि अशा
व्यक्तीची संपूर्ण देयता ` ५०, ००,००० ची आहे. तसेच तो कोणत्याही मार्गाने पुन्हा उत्पन्न उभारण्यास असमर्थ असेल आणि
न्यायालय जर समाधानी असेल तर अशा व्यक्तीला दिवाळखोर म्हणून घोषीत करण्यात येईल.
17.Accounting Year:
It is the period of 12 months for which accounts are maintained and closed by the proprietor.
Earlier the proprietors were following any accounting year i.e. calendar year , or financial year or any
other year as per tradition. But now for income tax purpose an accounting year starts on 1st April and
end on 31st March. At the end of accounting year a proprietor has to prepare Trading account, Profit
and Loss account and Balance Sheet to find out the financial position of the business.
17.लेखावर्ष / जमाखर्चाचे वर्ष (Accounting Year) :
व्यापारी ठेवत असलेल्या लेखा पुस्तकांच्या हिशोबाचा अवधी १२ महिन्यांचा असतो. हिशेबाचे वर्ष कोणते ठेवावे हे
सर्वस्वी त्या व्यापाऱ्यावर अवलंबून असते. परंतु सध्या आयकराच्या दृृष्टीनेलेखांकन वर्ष १ एप्रिल पासून सुरू होतेआणि
३१ मार्चला बंद होते. लेखांकन वर्षाच्या शेवटी व्यवसायाचा मालक, व्यापारलेखा, नफातोटा लेखा आणि ताळेबंद तयार करतो.
यावरून त्याला आपल्या व्यापाराची आर्थिक िस्थती कळते.
18.Trading Concern and Not for Profit Concerns.
i) Trading Concern: A business concern established with an object of earning profit by selling
goods is known as Trading concern. It is also called as commercial organization or profit making
organization.
ii) Not for Profit Concern: It is an organization not established for making profit but for rendering
services to the society. An organization may be formed for promoting a useful object like art,
science, sports, culture, charity, profession etc.
e.g Schools, Hospitals, Sports Club etc.
18. व्यापारी संस्था आणि नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था (Trading Concern and Not for Profit Concerns)
i) व्यापारी संस्था (Trading Concern) : व्यापारी संस्था या अशा संस्था होय कीज्या नफा मिळविण्याच्या उद्देशाने वस्तूची
विक्री करण्याकरीता स्थापन झालेल्या असतात. यांना व्यावसायिक संघटना किंवा नफा मिळविणाऱ्या संघटना यानावानेसुद्धा
ओळखले जाते.
ii) नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था (Not for Profit Concern) : नफ्याचा उद्देश सोडून समाजाच्या सेवेसाठी किंवा
सेवाप्रदान करण्यासाठी ज्या संस्था स्थापन केल्या जातात. त्या संस्थांना नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था असे म्हणतात. कला,
विज्ञान, क्रिडा, सांस्कृतिक कार्य, धर्मादाय कार्य, उपजिविकेचे उद्योग इत्यादी कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या
संस्था स्थापन केल्या जाऊ शकतात.
उदा. शाळा, दवाखाना,िक्रडामंडळे इत्यादी.
19.Goodwill:
Goodwill may be described as the aggregate of those intangible attributes of a business which
contributes to its superior earning capacity over a normal return on investment. It may arise from such
attributes as favourable locations, the ability and skill of its employees and management, quality of its
products and services, customer satisfaction etc.
u Goodwill is the reputation of business expressed in terms of money.
u Goodwill is an intangible asset
19.ख्याती / लौकीक मूल्य (Goodwill) :
ख्याती म्हणजे व्यवसायाचा पैशात मोजता येण्यासारखा नावलौकिक /पत / प्रतिष्ठा / किर्ती होय. ही व्यवसायाची अमूर्त
संपत्ती आहे. ख्यातीहेदुसरे-तिसरेकाही नसून व्यवसायाने बाजारपेठेत प्रस्थापित केलेलेआपले नाव होय. ख्यातीही, व्यवसायाच्या
इतर अमूर्त संपत्तीला जोडलेली अतिरिक्त मुल्य असलेली अमुर्त संपत्ती आहे.
u ख्याती म्हणजेव्यवसायाचा पैशात मोजता येण्यासारखा नावलौकीक
u ख्याती ही अमूर्त संपत्ती आहे.
20.Profit or Loss
a) Profit : When the selling price of goods is more than the cost price it is a profit. Profit increases
the capital of the business.
e.g. If goods are sold for ` 50,000/- and all expenses during the period amounted to
` 30,000/- then the profit is ` 20,000/
b) Loss : When cost price of goods is more than its selling price it is a loss. Loss decreases the
capital of business
e.g If goods are sold for ` 50,000/- and all expenses during the period amounted to
` 60,000/, then the loss will be ` 10,000/-
c) Income: It is revenue arising as a result of business transactions. It is the amount receivable or
realised from services provided and earnings from interest, dividend, commission, etc.
d) Revenue: It is income that a business has from its normal business activities usually from the
sale of goods and services to customer.
20. नफा किंवा तोटा (Profit or Loss)
अ) नफा / लाभ (Profit) : जेव्हा मालाची विक्रीची किंमत तिच्या परीव्यय मूल्यापेक्षा जास्त असते तेंव्हा त्यास नफा असे
म्हणतात. नफ्यामुळेव्यवसायाच्या भांडवलात वाढ होते.
उदा. एका आर्थिक वर्षात ` ५०,०००/- रुपयाच्या वस्तु विकल्या असतील आणि त्या आर्थिक वर्षात संपूर्ण खर्च
` ३०,०००/- आला असेल तर एका आर्थिक वर्षात व्यवसायाला ` २०,०००/- रू नफा झाला असेम्हणता येईल.
ब) तोटा (Loss) : जेव्हा मालाची विक्रीची किंमत तिच्या परीव्यय मूल्यापेक्षा कमी असते तेंव्हा त्यास तोटा असेम्हणतात.
तोट्यामुळेव्यवसायाचेभांडवल कमी होते.
उदा. जर एका आर्थिक वर्षात संपूर्ण वस्तूंची विक्री ` ५०, ०००/- केली गेली असेल आणि त्या वर्षात होणारा संपूर्ण खर्च
` ६०,००० असेल तर या प्रसंगी व्यवसायाला ` १०,००० तोटा झाला असेम्हणतात.
क) उत्पन्न (Income) : ही व्यावसायिक व्यवहारातून निर्माण झालेली महसुली प्राप्ती होय. वस्तू विक्री पासून किंवा ग्राहकांना
पुरविलेल्या सेवेपासून प्राप्त झालेली राशी होय. यात इतर घटकापासून मिळालेल्या उत्पन्नाचाही समावेश होतो. उदा. प्राप्त
भाडे, प्राप्त व्याज,प्राप्त वर्तन, प्राप्त लाभांश इ.
ड) महसुली (Revenue) : महसुली उत्पन्न म्हणजेव्यवसायाला वस्तूंच्या विक्रीपासून किंवा ग्राहकांना दिलेल्या सेवेपासून प्राप्त
झालेलेउत्पन्न होय.
Comments
Post a Comment