Posts

Showing posts from March, 2022

राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय National Income

  राष्ट्रीय उत्पन्न मोजणीची सुरुवात   जगात सर्वात प्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा प्रयत्न हा विल्यम पेटी याने 17 व्या शतकात केला होता. त्याने आयर्लंड या देशाचे उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने उत्पन्न मोजणीसाठी वापरलेली पद्धत ही अशास्त्रीय होती. राष्ट्रीय उत्पन्न मोजणीची शास्त्रीय पद्धत ही सायनम कुझनेट्स यांनी 1941  मध्ये शोधली .आर्थिक वाढीवरील संशोधन, राष्ट्रीय उत्पन्न मोजणीतील योगदान याबद्दल 1971 चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे कुझनेट्स यांना देण्यात आले रिचर्ड स्टोन   1947 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची  पद्धत शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष  UN-SNA ( United Nations- Systeam of National account)ही पद्धत 1953 मध्ये प्रकाशित केली.  या कार्याबद्दल  1984 चे  नोबेल पारितोषिक हे त्यांना देण्यात आले. SNA ही पुढे 1968,1993 व अलीकडे 2008 मध्ये सुधारीत करण्यात आली